सांगली महापालिकेच्या सर्व कार्यालयांत प्रत्यक्ष टपाल स्वीकारणे बंद !
सांगली – कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या कार्यालयांत नागरिकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून महापालिकेच्या सर्व कार्यालयांत प्रत्यक्ष टपाल स्वीकारणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी महापालिकेच्या कार्यालयांत प्रत्यक्ष न जाता त्यांचे आवेदन, निवेदन आणि पत्र smkcorporation@gmail.com या ई-मेल आयडीवर पाठवावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.