स्वरक्षण प्रशिक्षणवर्गात भावाच्या स्तरावर व्यायामप्रकार करून आनंद अनुभवणार्या रामनाथी आश्रमातील साधिका कु. गुलाबी धुरी !
‘मी २ – ३ मास स्वरक्षण प्रशिक्षणवर्गाला गेले नाही. त्यामुळे माझे शरीर दुखायला लागले. त्यामुळे मी पुन्हा वर्गाला जाऊ लागले. मी प्रशिक्षण करण्याआधी व्यायाम केला. तेव्हा ‘पूर्वीप्रमाणे मला व्यायाम प्रकार करायला जमत नाही’, असा विचार येऊन मला निराशा आली. नंतर व्यायामप्रकार करतांना त्यांना भावाची जोड दिल्यावर मला पूर्वीप्रमाणेच सर्व प्रकार जमू लागले आणि प्रशिक्षण करतांना आनंदही मिळाला.
१. काही व्यायामप्रकार करतांना त्यांना दिलेली भावाची जोड
१ अ. चवड्यावर उड्या मारणे : ‘माझे गुरु मला पुष्कळ दिवसांनी भेटले’, या आनंदात मी उड्या मारत आहे’, असा भाव ठेवल्यावर माझी उडी उंच जायला लागली.
१ आ. जाग्यावर धावणे : माझे गुरु जलद गतीने पुढे चालत आहेत आणि मला त्यांच्यासारखे जलद चालता येत नाही. त्यामुळे मी त्यांच्या मागे धावत आहे.
१ इ. मान वर-खाली करणे : मान वर करतांना मला गुरूंचे मुख दिसणार आहे आणि मान खाली केल्यावर गुरूंचे चरण दिसणार आहेत.
१ ई. मान डाव्या-उजव्या बाजूनेे फिरवणे : माझ्या डाव्या बाजूला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि उजव्या बाजूला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ उभ्या आहेत अन् मी त्यांना पहात आहे.
१ उ. मान गोल फिरवणे : चारही बाजूंना माझे गुरु दिसत आहेत आणि त्यांना पहाण्यासाठी मी मान गोल फिरवत आहे.
१ ऊ. खांदा गोल फिरवणे : मी ‘शून्य’ आणि ‘महाशून्य’ असा जप करत आहे.
१ ए. उजवा हात डाव्या पायाला आणि डावा हात उजव्या पायाला लावणे : मी गुरुचरणांना स्पर्श करत आहे.
१ ऐ. श्वास घेत मागे जाणे आणि ३ वेळा समोर वाकून सोडणे : माझ्याकडून आतापर्यंत झालेल्या चुका आठवून मी गुरुचरणी शरण जात आहे. गुरूंच्या चरणांना स्पर्श करत आहे. (असा भाव असल्यामुळे संपूर्ण झुकून खाली वाकल्यावर कंबरेला हलकेपणा जाणवायचा.)
१ ओ. बाजू बैठका : खाली बसल्यानंतर मला उठतांना त्रास व्हायचा. त्या वेळी मी सहसाधिकचे हात पकडून बाजू बैठका काढायचे. सहसाधिकेने, म्हणजे गुरूंनीच माझा हात धरला आहे. ते मला उठवण्यासाठी साहाय्य करत आहेत.
१ औ. दंड : मी गुरुचरणांवर शिरसाष्टांग दंडवत घालत आहे आणि गुरु प्रसन्न होर्ईपर्यंत मला दंड काढायचे आहेत.
१ अं. श्वास घेणे : गुरुंचे चैतन्य श्वासासह माझ्या शरिरात जात आहे.
१ क. मुखप्रहार, उदरप्रहार आणि कटीप्रहार करणे : माझ्या मनगटात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि परात्पर गुरु डॉक्टर या तिन्हींची शक्ती कार्यरत आहे.
१ ख. मुहमार, उदरमार आणि कंबरमार करणे : माझ्यातील ‘प्रतिमा जपणे, भावनाशीलता आणि अप्रामाणिकपणा’ यांसारख्या अहंच्या पैलूंवर मी पायाने वार करून त्यांची क्षमता न्यून करत आहे. त्यामुळे ते नष्ट होत चालले आहेत.
२. प्रशिक्षणवर्गाच्या वेळी ठेवलेला भाव
‘श्रीकृष्ण वर्ग घेत असून मी गुलाबी नसून धनुधारी अर्जुन आहे’, असा भाव ठेवल्यानेे वर्गात दिलेल्या आज्ञेचे पालन करून प्रत्येक कृती साधना म्हणून केली जाते.
३. ‘प्रशिक्षणवर्गाला जाऊ नये’, असा नकारात्मक विचार आल्यावर ठेवलेले दृष्टीकोन
अ. माझ्या मनात कधी कधी ‘वर्गाला जाऊ नये’, असा विचार यायचा. त्या वेळी अंतर्मनातून ‘कृष्ण तुझी वाट बघत आहे. वर्गात गेल्यामुळे तुझ्यातील नकारात्मकता नष्ट होऊन तुला सकारात्मक ऊर्जा मिळणार आहे’, असा आवाज यायचा. त्यामुळे ‘वर्गाला जाणे योग्य आहे’, असे वाटून मी तत्परतेने वर्गाला जायचे.
आ. वर्ग चालू होण्यापूर्वी मला आतून आवाज यायचा, ‘वर्गाला १५ मिनिटे शेष आहेत. उठ. गुलाबी जागी हो.’ त्या वेळी मला झोपेतून जाग यायची आणि मी वर्गाला जात असे.
इ. ‘वर्गाला जायला नको. आज थोडा वेळ झोपूया’, असा माझ्या मनात विचार आल्यावर आतून आवाज यायचा, ‘गुलाबी, किती आळशी गं तू ! गुरु तुझी वाट पहात आहेत आणि तू झोपण्याचा विचार करतेस ? ’ मग मला लाज वाटायची आणि मी वर्गाला जात असे.
ई. ‘वर्गात तेच तेच प्रकार घेतात. आज जायला नको’, असे मला वाटायचे. त्या वेळी मन सांगायचे, ‘प्रकार तेच असू देत; परंतु तुझी क्षमता वाढवण्यासाठी तू वर्गाला जा.’ आपत्काळात क्षमता असणार्या साधकांची पुष्कळ आवश्यकता असणार आहे. त्यांच्यात तुझे नाव असलेच पाहिजे.’
उ. ‘वर्गात मुले अल्प असल्यास उत्साह येत नाही. त्यमुळे वर्गाला जायला नको’, असा विचार आल्यास गुरु सांगायचे, ‘गुलाबी, तू इतरांसाठी वर्गाला जातेस कि स्वतःसाठी ? सर्वांनीच तुझ्यासारखा विचार केला, तर वर्गाला कुणीच येणार नाही. मग हिंदु राष्ट्रासाठी मावळे कसे घडतील ? तू जायला हवेस.’ नंतर मी उत्साहाने वर्गाला जात असे.’
– कु. गुलाबी धुरी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.१२.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |