जीवनात संघर्ष जितका मोठा, तितके यशही मोठे !
‘प्रत्येक मनुष्याला जीवनात कधी ना कधी तरी कुठल्या ना कुठल्या तरी स्तरावर संघर्ष हा करावाचा लागतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांनाही जीवनात प्रचंड संघर्ष करावा लागला होता. त्यांनी संघर्षाला मोठ्या धैर्याने तोंड दिले; म्हणून त्यांना पुढे यश अन् कीर्तीही मोठी लाभली. यास्तव जीवनात कराव्या लागणार्या संघर्षापुढे गुडघे टेकणार्यांनी, प्रतिकूल परिस्थितीला दोष देणार्यांनी आणि स्वतःच्या भाग्याची तुलना इतरांच्या भाग्याशी करण्यात वेळ वाया घालवणार्यांनी हे लक्षात ठेवावे, ‘जीवनात संघर्ष जितका मोठा, तितके यशही मोठे !’ – (पू.) श्री. संदीप आळशी (१४.११.२०२०)