प्रशासनाने अनावश्यक रस्त्यावर फिरणार्या नागरिकांचा बंदोबस्त करावा ! – शंभूराज देसाई, गृहराज्यमंत्री
सातारा, १७ एप्रिल (वार्ता.) – कोरोनाचा नवीन विषाणू अत्यंत घातक आहे. कोणतीही लक्षणे न दिसता अनेकांना तो बाधित करत आहे. त्यामुळे कोरोना थांबवणे हे राज्यशासनाचे मुख्य ध्येय आहे. याविषयी कडक भूमिका घेणे आवश्यक असून अनावश्यक रस्त्यावर फिरणार्या नागरिकांचा बंदोबस्त पोलीस आणि प्रशासन यांनी करावा, अशा सूचना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या कडक निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर मंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच मंत्री शंभूराज देसाई यांनी कोरेगाव, रहिमतपूर आणि मसूर येथे भेट देऊन वैद्यकीय व्यवस्थेविषयी संबंधितांना विविध सूचना केल्या. या वेळी आमदार महेश शिंदे, शिवसेनेचे सातारा-सांगली जिल्हा संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.