ड्रमसेट, क्लॅरिओनेट आणि गिटार या पाश्चात्त्य वाद्यांचे व्यक्ती आणि तिचे मन यांवर आध्यात्मिकदृष्ट्या होणारे अन्य त्रासदायक दुष्परिणाम !
संगीत आणि नृत्य यांवरील प्रयोगांच्या सूक्ष्माच्या संदर्भातील वार्ता (सूक्ष्म-वार्ता) !
संगीत आणि वाद्ये यांविषयी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे मूलभूत आध्यात्मिक संशोधन
संगीत सदर
ईश्वरप्राप्तीसाठी संगीतयोग
या जगामध्ये काही गोष्टी डोळ्यांनी दिसतात, तर काही दिसत नाहीत. ‘ज्या गोष्टी डोळ्यांनी दिसत नाहीत, त्या अस्तित्वात नसतात’, असा अर्थ होत नाही, उदा. वारा डोळ्यांना दिसत नाही, म्हणजे ‘तो नाही’, असे नाही. साधनेमुळे जिवाची सात्त्विकता वाढू लागते. साधना जसजशी वृद्धींगत होत जाते, तसतशी स्थूल पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील ‘सूक्ष्मातील’ कळू लागते आणि एखाद्या गोष्टीतील चांगली अन् त्रासदायक स्पंदने जाणवू लागतात. सध्या समाज सात्त्विकतेपासून दूर चालला आहे आणि रज-तमात्मक चालीरिती समाजात दृढ होत आहेत. संगीत आणि नृत्य हे क्षेत्रही याला अपवाद नाही. हे समाजाला दाखवून देण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने आम्ही संगीत आणि नृत्य यांवर संशोधनात्मक प्रयोग केले. जे आम्हाला सूक्ष्मातून जाणवले, ते समाजाला सांगण्यासाठी आणि ‘योग्य काय असायला हवे ?’ ते त्याला समजण्यासाठी, ते वैज्ञानिक उपकरणांद्वारेही सिद्ध करून दाखवले आहे. येथे केवळ ‘अयोग्य गोष्टींचा कसा परिणाम होतो ?’, हे दाखवून देणार्या, म्हणजेच सूक्ष्माच्या संदर्भातील काही वार्ता (सूक्ष्म-वार्ता) देत आहोत.
पाश्चात्त्य संगीताने शरीर डोलते, तर भारतीय संगीतात मनाचा ठाव घेण्याची क्षमता आहे. पाश्चात्त्य संगीत जिवाला बहिर्मुख आणि आक्रमक, तर भारतीय संगीत ऐकणार्याच्या अंतरंगात जाऊन त्याला संयमी अन् शांत करते. ‘पाश्चात्त्य वाद्यांच्या ध्वनीमुळे वातावरणात केवळ रज-तम वाढत नाही, तर त्यासमवेत वाईट शक्तीही आकृष्ट होतात’, असे लक्षात आले आहे. त्या अनुषंगाने ९.९.२०१७ या दिवशी सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात वाईट शक्तींचा तीव्र त्रास असलेल्या साधकांना पाश्चात्त्य पद्धतीचे वादन ऐकवल्यावर होणार्या विपरित परिणामांचा अभ्यास करण्यात आला. त्या वेळी लक्षात आलेल्या ठळक गोष्टी पुढे देत आहोत.
१. आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांनी पूर्वी कधीही न केलेले सालसा, बॉल, ब्रेक आदी नृत्यप्रकार सलग काही घंटे करणे
१ अ. शास्त्रीय नृत्य शिकलेल्या साधिकांनी अनभिज्ञ असेे पाश्चात्त्य नृत्यप्रकार सलग ७ – ८ घंटे करणे : प्रयोगातील काही साधिका भरतनाट्यम् आणि कथ्थक हे भारतीय शास्त्रीय नृत्य शिकल्या आहेत. पाश्चात्त्य वाद्यांच्या धूनवर त्यांच्यासह काही साधकांनी सलग ७ – ८ घंटे सालसा, बॉल, ब्रेक इत्यादी पाश्चात्त्य नृत्यप्रकार केले. प्रत्यक्षात अशा प्रकारचे नृत्य या साधकांपैकी कोणीही यापूर्वी केलेले नाही.
१ आ. साधकाने गाणे ऐकवण्यापूर्वीच ‘मायकल जॅक्सनचे गाणे ऐकवतील’, अशी शक्यता वर्तवून त्याच्याप्रमाणे नृत्य करणे : वाईट शक्तींचा तीव्र त्रास असलेल्या एका साधकाने गाणे ऐकवण्यापूर्वीच ‘बहुतेक मायकल जॅक्सनचे गाणे ऐकवतील’, असे २ – ३ साधकांंना सांगितले होते. यावरून त्या साधकाला त्रास देणार्या वाईट शक्तीला आता ‘मायकल जॅक्सनचे गाणे ऐकवतील’, हे सूक्ष्मातून आधीच कळले होते. या साधकाने मायकल जॅक्सनचे नृत्य असलेले कोणतेही चलत्चित्र (व्हिडीओ) कधीही पाहिलेले नाही, तरीही मायकेल जॅक्सन ज्याप्रमाणे नाचायचा, हुबेहूब त्याप्रमाणेच सराईतपणे नृत्य केले.
२. दोन साधिकांनी डोळे बंद करून सराईतपणे नृत्य करणे
त्रास असणार्या दोन साधिकांनी डोळे बंद करून सराईतपणे नृत्य करू लागल्या. दोघींनी एकत्रित नृत्य करणे, हे वाईट शक्तींचा एकमेकांशी असलेला समन्वय आणि संघटन दर्शवते.
३. पाश्चात्त्य पद्धतीचे वादन ऐकतांना साधकांच्या मनात आलेल्या अहंयुक्त आणि अन्य विचारांवरून ‘पाश्चात्त्य वाद्यांमुळे भावना उद्दीपित होतात’, हे लक्षात येणे
३ अ. इलेक्ट्रिक गिटार ऐकतांना त्रासदायक दृश्य दिसणे : इलेक्ट्रिक गिटार ऐकतांना एक साधिका हाताच्या विविध मुद्रा करत होती. नंतर तिला या कृतींसंदर्भात काहीही आठवत नव्हते. केवळ ‘ती एका वाळवंटात असून ती तेथे त्रासदायक लोकांमध्ये आहे’, असे एक दृश्य तिला आठवत होते. यावरून तिचा त्रास वाढला होता, असे जाणवले.
३ आ. वाद्ये ऐकतांना अहंयुक्त आणि अन्य विचार मनात येणे : इलेक्ट्रिक गिटार, ड्रम इत्यादी वाद्ये ऐकतांना अन्य दोन साधकांच्या मनात ‘मी श्रेष्ठ आहे’, ‘इतरांवर कुरघोडी करावी’, अशा स्वरूपाचे अनेक विचार येत होते. त्या दिवशी प्रयोगात सहभागी झालेल्या त्रास असलेल्या अन्य साधकांमध्येही काही कारण नसतांना अगदी क्षुल्लक कारणांवरून वाद झाले. प्रयोगानंतर तीन दिवस एका साधिकेच्या मनात नकारात्मक विचार येत होते. यावरून या वाद्यांची मनावर होणारा दुष्परिणाम काही काळ टिकतो, हे लक्षात येते.
३ इ. क्लॅरिओनेट आणि गिटार ऐकतांना साधकाच्या आध्यात्मिक त्रासात वाढ होणे : क्लॅरिओनेट आणि गिटार ऐकतांना एका साधकाचा आध्यात्मिक त्रास वाढला होता. तो अन्य साधकांनाही बॉल डान्स करण्यासाठी बोलावत होता.
३ ई. साधकांनी विविध पदार्थ, कपडे आदी मायेतील गोष्टींविषयी बोलणे : क्लॅरिओनेट सारखी वाद्ये मेजवान्यांमध्ये वाजवली जातात. अशा मेजवान्यांमध्ये सहभागी झालेले बहुतेक लोक खाणे-पिणे, कपडे, अलंकार आदी मायेतील गोष्टींमध्येच रममाण असतात. या प्रयोगात सहभागी झालेल्या वाईट शक्तींचा तीव्र त्रास असलेल्या साधकांचे वर्तन त्यांच्यासारखेच होते. प्रयोगातील साधक खाण्याचे पदार्थ, कपडे आदी मायेतील गोष्टींवर बराच वेळ चर्चा करत होते. काही साधिकांनी ‘आवडीचे पदार्थ खात आहोत’, असा अभिनयही करून दाखवला.
३ ई १. साधकांनी मायेतील कृती सलग ७ – ८ घंटे करणे अशक्य असल्याने त्यांना त्रास देणार्या वाईट शक्तींनी या कृती केल्याचे स्पष्ट होणे : समर्थ रामदास स्वामींच्या ‘टवाळा आवडे विनोद’ या उक्तीप्रमाणे सज्जनांचे वर्तन कधीच असे नसते. साधक स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी घरदार सोडून पूर्णवेळ साधना करण्यासाठी आश्रमात आलेे आहेत. ते गप्पाटप्पा मारणे, विनोद करणे, विविध खेळ खेळणे, चित्रपटांमधील कथानक सांगणे इत्यादी मायेतील कृती सलग ७ – ८ घंटे मुळीच करणार नाहीत आणि करूही शकणार नाहीत. त्यामुळे ‘या सर्व कृती त्यांना त्रास देणार्या वाईट शक्तीच करत होत्या’, हे लक्षात आले.
४. निष्कर्ष
पाश्चात्त्य वाद्यांच्या नादाचा अभ्यास करण्यासाठी आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांच्या पाश्चात्त्य वादन ऐकण्यापूर्वी आणि पाश्चात्त्य वादन ऐकल्यावर ‘यू.ए.एस.’ या उपकरणाच्या सहाय्याने सकारात्मक आणि नकारात्मक प्रभावळींचा अभ्यास करण्यात आला. त्यात पाश्चात्त्य वाद्यसंगीत ऐकल्यावर या साधकांची नकारात्मकतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे आणि सकारात्मकता मोठ्या प्रमाणात घटल्याचे प्रकर्षाने जाणवले. यावरून पाश्चात्त्य वाद्यांच्या नादातच रज-तमात्मक स्पंदने अधिक असल्याने ऐकणार्याच्या नकारात्मक उर्जेत वाढ होते हे येथे अभ्यासायला मिळाले.
त्याचप्रमाणे मेजवान्यांमधील धूसर प्रकाशयोजना आणि तोकड्या अन् काळ्या रंगाच्या पेहरावांमुळे (राजसिक आणि तामसिक कृतींमुळे) तेथे वातावरणातील वाईट शक्ती आकृष्ट होतात, तर मंदिरातील सात्त्विकतेमुळे तेथे दैवी शक्ती आकृष्ट होते, हे आपल्या लक्षात येते.’
– कु. तेजल पात्रीकर, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (८.११.२०१७)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |