जगद्गुरु डॉ. श्याम देवाचार्य महाराज यांचे देहावसान

जबलपूर (मध्यप्रदेश) – राज्यातील नर्मदा कुंभमेळ्याचे संस्थापक जगद्गुरु डॉ.  श्याम देवाचार्य महाराज (वय ६८ वर्षे) यांचे कोरोनामुळे देहावसान झाले. त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतले होते. त्यानंतर ते कुंभमेळ्यासाठी गेले होते. तेथे त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्या निधनाविषयी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दुःख व्यक्त केले आहे.