असे करावे लागते, हे समितीसाठी कौतुकास्पद, तरी हिंदूंसाठी लज्जास्पद !
‘बेंगळुरू (कर्नाटक) शहरात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ४.४.२०२१ या दिवशी रस्त्याच्या कडेला, झाडाच्या खाली बेवारस पडलेली हिंदूंच्या देवतांची चित्रे, देवतांच्या मूर्ती गोळा करून त्या स्थळाची स्वच्छता करण्याचे अभियान राबवण्यात आले. शहराच्या केंगेरी, राजाजीनगर, लोटगनहळ्ळी, मारुतिनगर आदी भागांमध्ये हे अभियान राबवण्यात आले.’ (८.४.२०२१)