मुंबईमध्ये संपूर्ण दळणवळणबंदी करायला हवी ! – महापौर, मुंबई
कुंभमेळ्याहून परतणार्या भाविकांना ‘क्वारंटाईन’ करणाचा विचार
मुंबई – मुंबईतील ५ टक्के दायित्वशून्य नागरिकांमुळे उरलेल्या ९५ टक्के नागरिकांना अडचण येत आहे. ९५ टक्के मुंबईकर कोरोनाविषयीच्या नियमांचे पालन करतात; पण ५ टक्के लोक निर्बंधांचे पालन करत नाही. त्यांच्यामुळे अन्यांना अडचण येते. सध्याची परिस्थिती पहाता मुंबईमध्ये संपूर्ण दळणवळण बंदी लागू करायला हवी, असे वक्तव्य मुंबईच्या महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांनी केले. कुंभमेळ्याहून येणार्या भाविकांना ‘क्वारंटाईन’ करण्याचा विचार असल्याचेही या वेळी सौ. किशोरी पेडणेकर यांनी म्हटले.