मनमोकळेपणा आणि आध्यात्मिक मित्र

सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सांगितलेली साधनेविषयीची मौलिक सूत्रे

सद्गुरु राजेंद्र शिंदे

‘मनमोकळेपणाने मनातील विचार त्वरित उत्तरदायी साधक किंवा संबंधितांना सांगावेत. शब्दांत मांडता येत नसल्यास विचार लिहून उत्तरदायी साधकांना द्यावेत. आपण आपल्या मनातील जे विचार इतरांना सांगू शकत नाही, अशा विचारांचा निचरा होऊन मन शांत होण्यासाठी ‘आध्यात्मिक मित्र किंवा मैत्रीण’ असल्यास त्यांच्याशी बोलावे. त्यामुळे मनावरील ताण अल्प होतो.’

– (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.१०.२०१९)