यावर्षी पंढरपूर येथील चैत्र यात्रा प्रतिकात्मक आणि मर्यादित स्वरूपात करण्याचा निर्णय !
पंढरपूर – कोरोनाच्या संसर्गाचा धोका लक्षात घेता पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने यंदाच्या वर्षी साजरी होणारी चैत्र यात्रा प्रतिकात्मक आणि मर्यादित स्वरूपात करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मंदिर समितीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
या संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी १५ एप्रिल या दिवशी सकाळी ११ वाजता भक्तनिवास येथे समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘ऑनलाईन’ स्वरूपात बैठक झाली. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.