(म्हणे) ‘ज्यांचे वय झालेले असते, त्यांना मरावेच लागते !’
मध्यप्रदेशातील भाजप सरकारचे मंत्री प्रेमसिंह पटेल यांचे कोरोनामुळे होणार्या मृत्यूंवर विधान !
अशा प्रकारचे विधान करणारे मंत्री जनतेप्रती किती संवेदनशील आहेत, हे लक्षात येते ! कोरोनासारख्या संकट काळात शासनकर्ते, प्रशासन जनतेचे रक्षण करण्यास असमर्थ असल्याने आता जनतेने देवाची आराधना करणेच आवश्यक आहे !
भोपाळ (मध्यप्रदेश) – कोरोनामुळे होणारे मृत्यू कुणीही रोखू शकत नाही. ज्यांचे वय झाले आहे, त्यांना मरायचेच आहे, अशा प्रकारचे विधान मध्यप्रदेशातील भाजप सरकारमधील मंत्री प्रेमसिंह पटेल यांनी पत्रकारांशी बोलतांना केले.
कोरोना वायरस के बढ़ते संक्रमण और मौत के आंकड़ों के बीच मध्य प्रदेश के मंत्री ने विवादित बयान दिया है#Coronavirus #MadhyaPradesh https://t.co/tvNYVxASA5
— Zee News (@ZeeNews) April 15, 2021
प्रेमसिंह पटेल यांना एका पत्रकाराने कोरानामुळे होणार्या मृत्यूंविषयी प्रश्न विचारल्यावर ते म्हणले की, लोकांनी कोरोनापासून वाचण्यासाठी सहकार्य केले पाहिजे. लोकांनी मास्क लावण्यासह सुरक्षित अंतर ठेवले पाहिजे. डॉक्टांनाकडून योग्य उपचार केले पाहिजेत. तुम्ही म्हटले की, अनेक लोकांचा मृत्यू होत आहे. ज्यांचे वय होते त्यांचा मरावेच लागते.