शिवपुरी (मध्यप्रदेश) येथील कोरोनाबाधित रुग्णाला लावलेला ऑक्सिजन काढल्यामुळे त्याचा मृत्यू !
प्रशासनाकडून रुग्णालयाची स्थिती आधीच चिंताजनक असल्याचे सांगण्याचा दावा सीसीटीव्ही चित्रीकरणातून खोटा असल्याचे उघड !
या रुग्णालयातील संबंधित अधिकार्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !
शिवपुरी (मध्यप्रदेश) – येथील जिल्हा रुग्णालयात एका वॉर्डबॉयने रुग्णाला लावण्यात आलेला ऑक्सिजन काढल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना सीसीटीव्हीच्या चित्रीकरणातून उघड झाली आहे. रुग्णालय प्रशासनाने मात्र ‘या रुग्णाची स्थिती चिंताजनकच होती’, असे सांगण्याचा प्रयत्न केला होता; मात्र चित्रीकरणातून सत्य बाहेर आले. मृत रुग्णाचे नाव सुरेंद्र आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी एक चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.
Covid patient in MP dies after a ward boy allegedly removes oxygen supply https://t.co/Dw7atPV9MH
— Hindustan Times (@HindustanTimes) April 15, 2021