हिंदु धर्मावर होणार्या आघातांच्या विरोधात जागृती करण्याची आवश्यकता ! – महामंडलेश्वर बालयोगी आचार्य श्री स्वामी सत्यात्मानंद गिरिजी महाराज
धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी हिंदु जनजागृती समिती
हरिद्वार येथील कुंभमेळ्यात हिंदु जनजागृती समितीचे ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’
हरिद्वार, १५ एप्रिल (वार्ता.) – हरियाणा परिसरात धर्मांतर रोखण्यासाठी मी स्वतः रस्त्यावर उतरून प्रयत्न केले आहेत. ३० सहस्रांहून अधिक लोकांना पुनः धर्मात आणले आहे. हे करतांना षड्यंत्रपूर्वक माझ्यावर आक्रमणे झाली. तरी मी मागे हटलो नाही. सद्यःस्थितीत संत समाजाने कथा, प्रबोधन करण्यासमवेत हिंदु धर्मावर होणार्या आघातांच्या विरोधात जागृती आणि कार्य करण्याची आवश्यकता आहे. या कार्यात मी सदैव तुमच्या समवेत आहे, असे मार्गदर्शन पंचायती निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्वर बालयोगी आचार्य श्री स्वामी सत्यात्मानंद गिरिजी महाराज यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील कुंभमेळ्यात ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’ राबवण्यात येत आहे. त्या अंतर्गत हिंदु समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी त्यांची भेट घेतली. त्या वेळी ते बोलत होते.
संतांवर होणार्या आघातांच्या विरोधात दबावगट सिद्ध होणे आवश्यक !
श्री स्वामी सत्यात्मानंद गिरिजी महाराज पुढे म्हणाले, ‘‘हिंदूंच्या अनेक संस्था असल्या, तरी समाजात जाऊन लोकांना जागृत करून त्यांना संघटित करणे आवश्यक आहे. देशात सहस्रो पशूवधगृहे असून त्यांचा विरोध करायला हवा. संतांवर होणार्या आघातांच्या विरोधात एक दबावगट सिद्ध होणे आवश्यक आहे.