विवेक म्हणजे काय ?

प.प. भगवान श्रीधरस्वामी

‘जगाकडे नामरूपात्मक दृष्टीने बघणे आणि त्याला कारणीभूत असणारे स्वयं-प्रकाशमान अधिष्ठान विसरणे, म्हणजेच ‘अविवेक’. या वृत्तीमध्ये मोडणारे सर्व कार्यकारण भावज्ञान-विरहित भासणे होय. हे शक्य नसल्यामुळे सर्व नामरूपात्मक कार्यजात केवळ अधिष्ठानात्मक आहे. या दृष्टीने नामरूपाचा भिन्नभाव मनात न आणता आणि नामरूपात्मक भावनेनेच जे संस्कार उद्दिपित होतात, त्यांना आश्रय न देता निर्विकार अधिष्ठानरूप स्वयंप्रकाशित ज्ञानच ग्रहण करणे, म्हणजे ‘विवेक’ होय.’

– प.प. भगवान श्रीधरस्वामी

(संदर्भ : मासिक, ‘श्रीधर-संदेश’, मार्च १९९८)