राजकीय नेत्यांकडून डॉक्टरांना घरी बोलावून चाचण्या आणि उपचार करून घेण्याचा प्रकार !
देशातील डॉक्टरांची पंतप्रधानांकडे तक्रार !
असा प्रकार करणार्या राजकीय नेत्यांवर गुन्हा नोंद करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !
नवी देहली – राजकीय नेत्यांकडून शासकीय रुग्णालयांमध्ये कार्यरत असणार्या डॉक्टरांना चाचण्या आणि उपचार यांसाठी थेट घरी बोलावून घेतले जात आहे, अशी तक्रार ‘फेडरेशन ऑफ ऑल मेडिकल असोसिएशन’ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.
केंद्र सरकारकडून चालवल्या जाणार्या अनेक रुग्णालयांमध्ये स्वतंत्र ‘व्हीआयपी काऊंटर्स’ आहेत. तेथे केवळ राजकीय नेते आणि मंत्री यांच्याच चाचण्या केल्या जातात; मात्र अशा ठिकाणी डॉक्टरांसाठी स्वतंत्र ‘काऊंटर्स’ नाहीत. या महामारीच्या काळात डॉक्टर स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत आहेत; मात्र त्या मोबदल्यात त्यांना काय मिळत आहे, तर चाचण्यांसाठी लांब रांगामध्ये उभे रहावे लागत आहे. कोरोना झाल्यानंतर त्यांना खाट आणि आयसीयू हेही उपलब्ध होत नाही, अशी तक्रार ‘फेडरेशन ऑफ ऑल मेडिकल असोसिएशन’ने केली आहे.