मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कोरोनाची लागण
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्याच्या ९ दिवसानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर त्यांनी स्वतःला क्वारंटाईन केले आहे. उत्तरप्रदेशात ९५ सहस्र कोरोना रुग्ण उत्तरप्रदेशात ९५ सहस्रांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. राज्यातील अनेक रुग्णालयांमध्ये रुग्णांना सध्या खाटा, ऑक्सिजनसह व्हेंटिलेटरसुद्धा उपलब्ध नाही. इतर राज्यांप्रमाणेच उत्तरप्रदेशातसुद्धा रेमडेसिविर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा आहे. मुख्यमंत्री योगींनी यापूर्वीच गुजरातमधून २५ सहस्र रेमडेसिवीर इंजेक्शन मागवले आहेत.