दोन जणांना चकमकीत मारण्याची सचिन वाझे यांची योजना होती ! – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण
मुंबई – अँटिलिया आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात अटकेत असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे हे दोन जणांना चकमकीत मारणार होते, अशी माहिती राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (एन्आयएन्च्या) सूत्रांनी दिली. वाझे यांच्या घरी ज्या व्यक्तीचे पारपत्र आढळून आले, ती आणि अन्य एक व्यक्ती यांना मारण्याचा कट (एन्काऊंटर) होता.