कुंभमेळ्याची तुलना मरकज प्रकरणाशी करू नका ! – उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत
डेहराडून (उत्तराखंड) – कुंभमेळा आणि तबलिगी जमात या दोन प्रकरणांची तुलना करू नका. हरिद्वारमध्ये गंगानदीच्या किनारी १६ पेक्षा अधिक घाट आहेत. यांची तुलना देहलीच्या निझामुद्दीन मरकजशी करू नका. मरकजमध्ये लोक एका खोलीत बंद होते. त्यामुळे कोरोना पसरला; मात्र कुंभमेळा मोकळ्या वातावरणात होत असल्याने कोरोनाचा फैलाव होणार नाही, असे विधान उत्तराखंडचे भाजपशासित मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देतांना केले.
Uttarakhand chief minister #TirathSinghRawat said that #NizamuddinMarkaz event was held in a closed space, whereas the #KumbhMela is being held in the open on the sprawling ghats of the Gangahttps://t.co/CfGpFqUnWe
— Firstpost (@firstpost) April 13, 2021
मुख्यमंत्री रावत पुढे म्हणाले की, कुंभमेळ्याला आलेले भक्त बाहेरचे नसून आपले लोक आहेत. कुंभमेळा १२ वर्षांतून एकदा येतो आणि हा लोकांच्या श्रद्धा अन् भावना यांचा विषय आहे. लोकांचे आरोग्य ही प्राथमिकता आहे; मात्र श्रद्धेकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही.