नागपूर येथे श्रद्धानंद अनाथालयातील विद्यार्थिनींनी ‘पोर्टेबल गुढी’ बनवली !
धार्मिक सण, परंपरा, रूढी यांचे विज्ञानीकरण करून नव्हे, तर धर्मशास्त्रानुसार आचरण केले, तर त्याचा आध्यात्मिक लाभ होतो, हे लक्षात घ्या !
नागपूर – शहरातील श्रद्धानंदपेठ येथील श्रद्धानंद अनाथालयातील अनुमाने २० विद्यार्थिनींनी ‘पोर्टेबल गुढी’ सिद्ध करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. दिवसातील काही घंटे अनाथालयातील विद्यार्थिनी अशी गुढी सिद्ध करून बाजारात त्याची विक्री करतात. यातून मिळालेले उत्पन्न श्रद्धानंद अनाथालयाचे प्रशासन या विद्यार्थिनींच्या बँक खात्यात जमा करत आहे. त्यामुळे भविष्यात या विद्यार्थिनींकडे स्वतःच्या पायावर उभे रहाण्याच्या निधीची कमतरता भासू नये, हा या मागचा उद्देश आहे. (मांगल्याचे प्रतीक म्हणून गुढीपाडव्याला गुढी उभारली जाते. उंच गुढी उभारल्याने या दिवशी पृथ्वीवर येणार्या चैतन्याचा अधिकाधिक लाभ गुढीच्या माध्यमातून घेता येतो. धर्मशास्त्रानुसार गुढीपाडवा सण साजरा न करता ‘पोर्टेबल गुढी’ लावून ती साजरी केल्याने अपेक्षित आध्यत्मिक लाभ होणार नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. – संपादक)