‘आर्.टी.पी.सी.आर्.’ आणि ‘एच्.आर्.सी.टी.’ सारख्या चाचण्या शासकीय यंत्रणेकडून विनामूल्य करण्यात याव्यात ! – कॉमन मॅन संघटना
कोल्हापूर – देशातील कोरोनाबाधितांची संख्या ब्राझीलच्या रुग्णसंख्येपेक्षा पुढे सरकली आहे. गेल्या २४ घंट्यात उच्चांकी १ लाख ६९ सहस्र रुग्ण आढळले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात २४ घंट्यांत ३०८ नवे रुग्ण आढळले असून ११ रुग्णांचा बळी गेला आहे. कोरोनामुळे आर्थिक मंदीची लाट येण्याची शक्यता असून याचा फटका गोरगरीब, कष्टकरी, दैनंदिन काम करून कुटुंब चालवणारे रिक्शावाले, असंघटित कामगार यांना बसणार आहे. तरी यावर उपाययोजना म्हणून ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ आणि ‘एच्.आर्.सी.टी.’ सारख्या चाचण्या शासकीय यंत्रणेकडून विनामूल्य करण्यात याव्यात. यांसह अन्य उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी कॉमन मॅन संघटनेचे अधिवक्ता बाबा इंदुलकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.