पुणे येथील धर्मांध कंपाऊंडर नाव पालटून २ वर्षांपासून चालवत होता ‘मल्टीस्पेशालिटी’ रुग्णालय !

पुणे, १३ एप्रिल – येथील शिरूरमध्ये आधुनिक वैद्यांच्या हाताखाली काम करणार्‍या धर्मांध कंपांऊडरने बनावट नाव आणि वैद्यकीय पदवी सिद्ध करून स्वतःचेच २२ खाटांचे ‘मल्टीस्पेशालिटी’ रुग्णालय चालू केले आहे. २ वर्षांपासून डॉ. महेश पाटील या नावाने आरोपी रुग्णालय चालवत होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. कोविड रुग्णांसाठी त्याने स्वतंत्र कक्षही सिद्ध केला होता, अशी माहिती पोलिसांच्या अन्वेषणातून समोर आली आहे.

डॉ. महेश पाटील याचे मूळ नाव मेहबूब शेख असून तो नांदेड जिल्ह्यातील पीरबुर्‍हाण नगरचा रहिवासी आहे. मेहबूब शेख हा नांदेडमधील एका रुग्णालयामध्ये कंपांऊडर म्हणून काम करायचा. काम करत असतांना त्याला वाटले की, वैद्यकीय कौशल्य आपण शिकलो आहोत. त्यानंतर त्याने शिरूरमध्ये २ वर्षांपूर्वी ‘मौर्या मल्टीस्पेशालिटी’ रुग्णालय चालू केले. त्याने बनावट पदवी आणि आधार कोठून मिळवले, याचे अन्वेषण पोलीस करत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी रांजणगाव एम्.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. (२ वर्षांपासून कंपाऊंडर रुग्णालय चालवत आहे, ही बाब कुणाच्याच लक्षात कशी आली नाही ? निष्पाप नागरिकांच्या जिवाशी खेळणार्‍या अशा धर्मांधांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे. – संपादक)