धर्मांधांवर कठोर कारवाई करण्यासह सण-उत्सवांच्या वेळी हिंदूंना संरक्षण देण्यात यावे ! – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन
वाराणसी येथे होळीच्या दिवशी धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण केल्याचे प्रकरण
वाराणसी – येथील जैतपुरा पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात येणार्या मुसलमानबहुल सरैया भागात होळीच्या दिवशी धर्मांधांनी हिंदूंवर दगडफेक केली. या आक्रमणात अनेक हिंदू घायाळ झाले. या धर्मांधांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि सण-उत्सवांच्या वेळी हिंदूंना संरक्षण मिळावे, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
क्या #सर्वधर्मसमभाव का ठेका केवल हिन्दुओं ने ही ले रखा है ?#वाराणसी : सरैया में #होली का रंग उडने पर धर्मांधों द्वारा हिंदुओं पर पत्थरबाजी, कई हिन्दू घायल ; अजीम, आसिम गिरफ्तार
अब कहां गए ‘#असहिष्णुता’ पर बवाल खडा करनेवाले ढोंगी #सेक्युलरवादी ? pic.twitter.com/CXXh3BwCOQ
— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) April 2, 2021
या वेळी अधिवक्ता संजीवन यादव, अधिवक्ता विकास तिवारी, हिंदु जागरण मंचाचे अधिवक्ता सौरव प्रताप सिंह, धर्मप्रेमी श्री. राकेश गुप्ता आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन केसरी आदी उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, होळीच्या दिवशी हिंदु मुले होळी खेळत असतांना त्यांच्या रंगाचा एक थेंब एका धर्मांधाच्या अंगावर पडला. त्याचा राग धरून धर्मांधांनी छतावरून हिंदूंवर दगडफेक केली. याविषयी स्थानिक हिंदूंनी सांगितले की, हिंदु मुले जेव्हा सण-उत्सव साजरे करतात, तेव्हा धर्मांध जाणीवपूर्वक दगडफेक करतात. असे आतापर्यंत ४ ते ५ वेळा झाले आहे. येथे हिंदू अल्पसंख्यांक असल्याने ते असुरक्षित वातावरणात जगत आहेत.