मनातही करा साजरा होलिकेचा सण ।
कराया साजरा । होलिकेचा सण ।
मनाचे स्थान । निवडीले ॥ १ ॥
ऐसे ते स्थान । साधने सारवले ।
भक्तीने शिंपिले । केले सिद्ध ॥ २ ॥
त्या स्थानी खळगा । समर्पणाचा केला ।
त्यात उभा केला । अहंकाररूपी एरंड ॥ ३ ॥
रचलीया तेथे । लाकडे वासनांची ।
इंद्रिये गोवर्यांची । रास भली ॥ ४ ॥
गुरुकृपा तैल । रामनाम घृत ।
अर्पिले तयात । ऐसे केले ॥ ५ ॥
रेखिली भोवती । सत्कर्मांची रांगोळी ।
भावरंगाचे मेळी । शोभिवंत ॥ ६ ॥
वैराग्य अग्नीसी । तयाते स्थापिले ।
यज्ञरूप आले । झाली कृपा ॥ ७ ॥
दिधली तयाते । विषय पक्वान्नाहुती ।
आणिक पुर्णाहूती । षड्रिपूरूपी श्रीफळाची ॥ ८ ॥
झाले सर्व हुत । वैराग्य अग्नीत ।
जाणावया तेथ । नुरले काही ॥ ९ ॥
ऐसी व्हावी होळी ।
जेणे मुक्तीची दिवाळी अखंडित ॥ १० ॥
(‘व्हॉट्सअॅप’वर आलेली एक कविता)
संग्राहक : श्री. अतुल पवार, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१०.३.२०२०)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |