सर्वोच्च न्यायालयाचे ५० टक्के कर्मचारी कोरोनाबाधित
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी होणार
नवी देहली – सर्वोच्च न्यायालयातील ५० टक्के कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाली आहे. न्यायालयाचे कर्मचारी कोरोनाबाधित असल्याने न्यायाधीश घरातूनच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी घेणार आहेत. न्यायालयाचा संपूर्ण परिसर सॅनिटाईज करण्यात येत आहे.
Corona second wave: Over 50% Supreme Court staff test Covid positive, judges to function from home
Track #Covid19 latest updates https://t.co/yE1anwFCW6 pic.twitter.com/e21biXxX7W— Economic Times (@EconomicTimes) April 12, 2021
कर्मचारी कोरोनाबाधित झाल्याचा परिणाम सुनावणीवरही झाला आहे. सकाळी १०.३० वाजता होणारी सुनावणी सर्व खंडपिठांकडून एक घंटा विलंबाने चालू होणार आहे. ११ वाजता होणारी सुनावणी १२ वाजता चालू होईल, अशी माहिती अतिरिक्त निबंधकांनी दिली आहे.