गुढीपाडव्याला नवीन वस्तूंची खरेदी किंवा कार्ये करण्यात वेळ आणि धन व्यय करण्यापेक्षा भावी युद्धकाळात जीवितरक्षण होण्यासाठी पूर्वसिद्धता अन् व्यय करा !
गुढीपाडव्यानिमित्त संदेश
‘गुढीपाडवा अर्थात् चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा हा हिंदूंचा वर्षारंभ आहे. ही युगादि तिथी शास्त्रानुसार साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी शुभ कार्ये पार पाडली जातात किंवा कार्याचे नवसंकल्प केले जातात. नव्या वस्तूंची खरेदी आणि कार्यांचा शुभारंभ यांसाठी हा दिवस शुभ मानला जातो. सध्या मात्र देश आणि विश्व संक्रमणकाळातून जात आहे. वैश्विक स्तरावर पसरलेली महामारी, आर्थिक मंदी, युद्धजन्य स्थिती इत्यादी सर्व आपत्काळाची लक्षणे आहेत. पुढील दोन-तीन वर्षे प्रतिकूल काळ असणार आहे. या काळात जगात प्रचंड जीवितहानी आणि वित्तहानी होण्याचा धोका आहे.
बाजारात मिळणारे ब्रेडसुद्धा महाग वाटावेत, अशी परिस्थिती ओढवणार आहे. काळाची ही गती लक्षात घेऊन या गुढीपाडव्याला नवीन वस्तूंची खरेदी किंवा कार्ये करण्यासाठी वेळ आणि धन व्यय (खर्च) करण्यापेक्षा या भावी युद्धकाळात जीवितरक्षण होण्यासाठी पूर्वसिद्धता अन् व्यय करणे उपयुक्त ठरेल.
या युद्धकाळानंतर जगाला विश्वकल्याणकारी व्यवस्था मिळण्यासाठी भारतात रामराज्यरूपी हिंदु राष्ट्र अवतरित होणे आवश्यक आहे. त्यामुळे हिंदूंनो, या गुढीपाडव्याला भारतात विश्वकल्याणकारी हिंदु राष्ट्र स्थापित करण्यासाठी कृतीशील होण्याचा नवसंकल्प करा !’
– (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले, संस्थापक, सनातन संस्था