देशात एका दिवसात १ लाख ६९ सहस्र कोरोना रुग्णांची नोंद
नवी देहली – देशात ११ एप्रिल या एका दिवसात १ लाख ६९ सहस्र ८९९ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. ही आतापर्यंतची एका दिवसात आढळून आलेली सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. या दिवशी देशभरात ९०४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे चिंताजनक गोष्ट म्हणजे बर्या होणार्या रुग्णांची संख्या घटतांना दिसत आहे.