१० वीची परीक्षा जूनमध्ये, तर १२ वीची परीक्षा मेच्या शेवटी घेणार !
मुंबई – विद्यार्थ्यांचे आरोग्य ही महाविकास आघाडीची प्राथमिकता आहे. त्यामुळे इयत्ता १० वी आणि १२ वी च्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. १० वी ची परीक्षा साधारणपणे जूनमध्ये होईल, तर १२ वी ची परीक्षा मे मासाच्या शेवटी होईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी १२ एप्रिल या दिवशी ट्वीटच्या माध्यमातून केली आहे.