सर्वोच्च न्यायालयाचे ५० टक्के कर्मचारी कोरोनाबाधित व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी होणार
नवी देहली – सर्वोच्च न्यायालयातील ५० टक्के कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाली आहे. न्यायालयाचे कर्मचारी कोरोनाबाधित असल्याने न्यायाधीश घरातूनच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी घेणार आहेत.
SC Judges to function from home, over 50% staff test Covid positive https://t.co/TPq39AHUE0 pic.twitter.com/36xbbTCWIm
— The Times Of India (@timesofindia) April 12, 2021
न्यायालयाचा संपूर्ण परिसर सॅनिटाईज करण्यात येत आहे. कर्मचारी कोरोनाबाधित झाल्याचा परिणाम सुनावणीवरही झाला आहे. सकाळी १०.३० वाजता होणारी सुनावणी सर्व खंडपिठांकडून एक घंटा विलंबाने चालू होणार आहे. ११ वाजता होणारी सुनावणी १२ वाजता चालू होईल, अशी माहिती अतिरिक्त निबंधकांनी दिली आहे.