सोलापूर येथे संचारबंदीच्या पहिल्या दिवशी २ लाख रुपये दंड वसूल !
वाहन जप्त केल्यास ३० एप्रिलनंतर देण्यात येईल ! – डॉ. वैशाली कडूकर, उपायुक्त
सोलापूर – संचारबंदीत विनाकारण घराबाहेर पडणार्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. संचारबंदीच्या पहिल्याच दिवशी पोलिसांनी १ लाख ९५ सहस्र रुपये दंड वसूल केला आहे. चारचाकी आणि दुचाकी यांसह अन्य वाहनातून फिरणार्या १८० विनामास्क व्यक्तींकडूनही ९६ सहस्र ५०० रुपयांचा दंड वसूल केला.
नियमाचे उल्लंघन करून रस्त्यांवरून फिरणारी वाहने जप्त केल्यानंतर ३० एप्रिलनंतर दंड भरून परत देण्यात येईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनी दिली. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनीही पोलिसांना याविषयी सक्त सूचना केल्या आहेत.