आजपासून व्यापार चालू करण्याचा निर्णय कायम: संपूर्ण दळणवळण बंदीचा निर्णय झाल्यास व्यापारी सहभागी होणार ! – ललित गांधी, महाराष्ट्र चेंबर
कोल्हापूर – १२ एप्रिलपासून व्यापार चालू करण्याचा व्यापार्यांचा निर्णय कायम असून संपूर्ण दळणवळण बंदीचा निर्णय झाल्यास त्यात व्यापारी सहभागी होतील. दळणवळण बंदीचा निर्णंय घाल्यास छोट्या व्यापार्यांना आर्थिक साहाय्याची आमची मागणी आहे, अशी माहिती महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललीत गांधी यांनी दिली. दळणवळण बंदीच्या संदर्भात व्यापार्यांची काय भूमिका घ्यावी यांसाठी व्यापार्यांची ऑनलाईन बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी राज्यभरातील व्यापारी संघटनांचे प्रमुख उपस्थित होते. त्यानंतर ललीत गांधी यांनी ही माहिती दिली.