कोरोना विषाणूंविरुद्ध आपल्यात प्रतिकारक्षमता वाढण्यासाठी आध्यात्मिक बळ मिळावे, यासाठी देवाने सुचवलेला नामजप !

sadguru_mukul_gadgil_
सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ

सध्या कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव जगभर होत आहे. ‘कौशिकपद्धति’ ग्रंथात ..

‘अतिवृष्टि: अनावृष्टि: शलभा मूषका: शुका: ।
स्वचक्रं परचक्रं च सप्तैता ईतय: स्मृता: ॥’

(अर्थ : धर्माचरण न केल्यामुळे अतीवृष्टी, अनावृष्टी (दुष्काळ), टोळधाड, उंदरांचा त्रास, पोपटांचा उपद्रव, आपापसांत लढाया आणि शत्रूचे आक्रमण यांसारखी संकटे (राष्ट्रावर) येत असतात.)

सध्या कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव जगभर होत असल्याने राष्ट्रावर आलेल्या या संकटाविषयी वैद्यकीय उपचारांसमवेत आध्यात्मिक बळ वाढवण्यासाठी कोणता नामजप करावा, हे मी जिज्ञासेने देवाला विचारले, ‘कोरोना विषाणूंचा प्रभाव स्वतःवर न होण्यासाठी किंवा झाला असल्यास तो नष्ट करण्यासाठी कोणत्या देवतातत्त्वांची आवश्यकता आहे ?’ त्या वेळी माझ्या मनात उत्तर आले, ‘देवी, दत्त आणि शिव ही तत्त्वे आवश्यक आहेत.’ कोरोना विषाणूंविरुद्ध स्वतःत प्रतिकारक्षमता निर्माण होण्यासाठी वैद्यकीय सल्ला आणि उपचार यांसमवेत आध्यात्मिक बळ वाढावे, म्हणून देवाने सुचवलेल्या या ३ देवतातत्त्वांच्या प्रमाणानुसार पुढील नामजप सिद्ध झाला – ‘श्री दुर्गादेव्यै नमः –  श्री दुर्गादेव्यै नमः – श्री दुर्गादेव्यै नमः – श्री गुरुदेव दत्त – श्री दुर्गादेव्यै नमः – श्री दुर्गादेव्यै नमः – श्री दुर्गादेव्यै नमः – ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप सहजतेने लक्षात येण्यासाठी त्याची फोड पुढीलप्रमाणे करता येईल – ‘श्री दुर्गादेव्यै नमः ।’ ३ वेळा, ‘श्री गुरुदेव दत्त ।’ १ वेळा, ‘श्री दुर्गादेव्यै नमः ।’ ३ वेळा आणि ‘ॐ नमः शिवाय’ १ वेळा. ‘या नामजपाचा परिणाम ओटीपोटावर होतो’, असे लक्षात आले. हा नामजप १०८ वेळा (१ माळ) करायला ४० मिनिटे लागतात. ‘कोरोना विषाणूंचा प्रभाव जगभर असेपर्यंत प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वैद्यकीय उपचारांसमवेत स्वतःचे आध्यात्मिक बळ वाढवण्यासाठी हा नामजप प्रतिदिन अर्धा घंटा (१ माळ) करावा. काहींना कोरोना विषाणूंची लागण झाल्याची काही लक्षणे दिसल्यास आध्यात्मिक बळ अधिक प्रमाणात वाढावे; म्हणून त्यांनी हा नामजप प्रतिदिन ३ घंटे (६ माळा) करावा’, असे देवाने सुचवले.’

– (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (२०.३.२०२०)

टीप : वरील नामजपाचा ऑडिओ https://www.sanatan.org/mr/helpful_chant_in_corona या लिंकवर उपलब्ध आहे.

(या लिंकवरील ऑडिओ ऑनलाईन ऐकता येईल. ऑडिओ डाऊनलोड करण्याची सुविधा सध्या उपलब्ध नाही, याची वाचकांनी नोंद घ्यावी.)