पार्किंग प्लाझा कोविड केंद्रामधील ऑक्सिजन संपला !
ठाणे, ११ एप्रिल (वार्ता.) – ठाणे महानगरपालिकेच्या पार्किंग प्लाझा कोविड केंद्रामधील ऑक्सिजनचा साठा संपला असल्याचे महानगरपालिकेने मान्य केले आहे. पालिकेने तेथील २६ रुग्णांना येथील ग्लोबल रुग्णालयात हालवल्यामुळे तेथेही ताण वाढला आहे आणि ऑक्सिजनची क्षमता न्यून होत आहे. रुग्ण संख्येत वाढ होत असतांनाच पालिकेने संबंधित आस्थापनाकडे मागणी करूनही ऑक्सिजनचा साठा उपलब्ध होऊ शकलेला नाही. त्यामुळे आता राज्य शासनाने यात लक्ष घालून महानगरपालिकेला आवश्यक असलेला ऑक्सिजनचा साठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.