राज्य सरकारकडून कोरोनाशी संबंधित चाचण्यांच्या दरात कपात !

पुणे येथे मात्र चाचण्यांसाठी जादा दराने आकारणी !

कोरोना महामारी संकटाच्या काळात नागरिकांना लुबाडणार्‍या प्रयोगशाळा, रुग्णालये आणि कोरोना सेंटर यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. लोकांची नीतीमत्ता ढासळल्याने समाजमूल्यांची पायमल्ली होत आहे. लोकांना सामाजिक मूल्ये आचरणात आणण्याचे महत्त्व लक्षात यावे, यासाठी धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे.

पुणे – राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच कोरोनाशी संबंधित चाचण्यांच्या दरात कपात केली आहे. आर्.टी.पी.सी.आर्. आणि रॅपिड अँटीजेन चाचणीसाठी अनुक्रमे ५०० रुपये आणि १५० रुपये असा दर निश्‍चित केला आहे; मात्र पुणे शहरातील काही खासगी प्रयोगशाळा, रुग्णालये आणि कोरोना सेंटरमध्ये नागरिकांना आर्.टी.पी.सी.आर्. चाचणीसाठी ६०० रुपये ते १ सहस्र रुपये, तर रॅपिड अँटीजेन चाचणीसाठी १५० रुपये ते ३०० रुपये मोजावे लागत आहेत.