सातारा जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा !
जिल्ह्याला प्रतिदिन रक्ताच्या १०० बाटल्यांची आवश्यकता
सातारा, ११ एप्रिल (वार्ता.) – कोरोनाशी दोन हात करतांना लसीच्या तुटवड्यासमवेत आता जिल्ह्यातील रक्तपेढीलाही विविध रक्तगटांच्या रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे. विविध अपघात, शस्त्रक्रिया, बाधित रुग्ण, थॅलसेमिया आदी रुग्णांसाठी प्रतिदिन १०० बाटल्या रक्त लागते. त्यामुळे रक्तदात्यांनी आता पुढे येऊन रक्तदान करण्याची आवश्यकता भासू लागली आहे.