सांगली महापालिका क्षेत्रात कोरोना लसीकरण नियमितपणे चालू : महापालिकेला ५ सहस्र लसी प्राप्त

सांगली, ११ एप्रिल – शासनाकडून सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेला ९ एप्रिलला रात्री उशिरा ५ सहस्र लसी प्राप्त झाल्या असून महापालिका क्षेत्रातील २९ केंद्रांवर कोरोना लसीकरण नियमितपणे चालू करण्यात आले आहे. महापालिकेची १६ आणि १३ खासगी रुग्णालये येथे हे लसीकरण करण्यात येत आहे. सर्व लसीकरण केंद्रांवर सामाजिक अंतर राखले जात आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.