श्रीलंकेच्या नवीन घटनेत हिंदु धर्मालाही बौद्ध धर्माएवढेच स्थान देण्याची शिवसेनाई संघटनेची मागणी !
श्रीलंकेतील हिंदूंची स्थिती सुधारण्यासाठी भारत सरकारनेही कृती करणे आवश्यक !
कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेतील शिवसेनाई या हिंदूंच्या हक्कांसाठी लढणार्या संघटनेने देशाच्या नव्या राज्यघटनेत काही तरतुदी करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार हिंदु धर्माला बौद्ध धर्माएवढेच स्थान देण्यात यावे, तसेच घटनेत जे प्राधान्य बौद्ध धर्माला आहे, ते हिंदु धर्मालाही द्यावे, अशी मागणी केली आहे.
संघटनेचे संस्थापक के. सच्चिदानंदन् यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. ते म्हणाले, ‘‘घटनेत धर्मांतरविरोधी कायद्याची तरतूद करणे आवश्यक आहे. असे केल्याने बौद्ध आणि हिंदु धर्म यांचे रक्षण होईल.’’ गोवंशियांची हत्या रोखण्यासाठी गोवंशहत्या विरोधी कायदा आणण्याची मागणीही त्यांनी केली.