म्हैसुरू (कर्नाटक) येथे ग्रंथालयाला लावण्यात आलेल्या आगीमध्ये गीतेच्या ३ सहस्र प्रती जळल्या
म्हैसुरू (कर्नाटक) – येथे समाजकंटकांनी एका ग्रंथालयाला लावलेल्या आगीत श्रीमद्भगवद्गीतेच्या ३ सहस्र, तर कुराण आणि बायबल यांच्या १ सहस्र प्रती नष्ट झाल्या. हे ग्रंथालय सैय्यद इसाक नावाच्या व्यक्तीचे आहे. येथे एकूण ११ सहस्र पुस्तके होती. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
इसाक हा कामगार असून तो अल्पशिक्षित आहे; मात्र लोकांना ज्ञान मिळावे म्हणून त्याने हे सार्वजनिक ग्रंथालय उभारले होते. यात प्रतिदिन १०० ते १५० जण येत होते. या ग्रंथालयासाठी तो प्रतिमहा ६ सहस्र रुपये खर्च करत होता.