रेमडेसिविर इंजेक्शनच्या व्ययाला पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीने संमती नाकारली !
पुणे, ११ एप्रिल – पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनामुळे अनेक रुग्ण गंभीर स्थितीत असतांना महापालिका प्रशासनाने रेमडेसिविर इंजेक्शनची केलेली खरेदी स्थायी समितीने ‘वेटिंग’वर ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे महापालिकेची रुग्णालये आणि कोरोना केअर सेंटरमध्ये रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. स्थायी समितीच्या या भूमिकेमुळे सर्वत्र अप्रसन्नता व्यक्त होत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने कोरोनाची गंभीर लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांना, रेमडेसिविर इंजेक्शन विनामूल्य देण्याचा निर्णय घेतला आहे. पुरवठादाराला याची रक्कम देतांना स्थायी समितीची मान्यता असणे आवश्यक असून खरेदी ‘वेटिंग’वर ठेवल्याने या प्रकरणावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.