बार्शी (जिल्हा सोलापूर) येथे रेमडेसिविर इंजेक्शनचा काळा बाजार करणार्या शहा मेडिकला टाळे ठोकले !
बार्शी (जिल्हा सोलापूर) – येथील तुळशीराम रोडवरील विक्रांत शहा यांच्या रुग्णालयातील मेडिकलमधून रेमडेसिविर इंजेक्शनचा काळा बाजार उघडकीस आल्याने अन्न आणि औषध प्रशासन तसेच बार्शी तहसील कार्यालय यांनी या ठिकाणी तपासणी करून शहा मेडिकलला टाळे ठोकले आहे.
१. येथील राजन ठक्कर या व्यक्तीने आपल्या दुकानातील एका व्यक्तीला रेमडेसिविर इंजेक्शन आणण्यासाठी या मेडिकल दुकानामध्ये पाठवले होते. प्रथम इंजेक्शन उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले होते; मात्र पुन्हा ४ सहस्र रुपयांना इंजेक्शन मिळेल, असे सांगण्यात आले. या वेळी कोणत्याही डॉक्टरांची चिठ्ठी नसतांनाही साध्या कागदावर या इंजेक्शनची मागणी करण्यात आली होती, तरीही येथील मेडिकल दुकानदाराने ४ सहस्र रुपये घेऊन हे इंजेक्शन काळ्या बाजारात विक्री केले.
२. शासनाने निश्चित करून दिलेल्या दरानुसार १ सहस्र ५०० ते १ सहस्र ७०० रुपयांहून अधिक दराने इंजेक्शन विक्री करता येत नाहीत, असे राजन ठक्कर यांनी म्हटले आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही बनवण्यात आला आहे.