लोणंद (जिल्हा सातारा) येथे पाईपलाईन फोडून पेट्रोलच्या चोरीचा प्रयत्न !
७ जण अटकेत
अशांना कठोर शासन केल्यासच या घटनांना आळा बसेल !
सातारा, १० एप्रिल (वार्ता.) – लोणंद (जिल्हा सातारा) येथे हिंदुस्थान पेट्रोलिअम आस्थापनाची पेट्रोल वाहून नेणारी पाईपलाईन फोडून पेट्रोलची चोरी करण्याचा प्रयत्न करणार्या अंतरराज्य टोळीला लोणंद पोलिसांनी पकडले आहे. याप्रकरणी पोलिसांनी सापळा रचून पुणे येथील पिंपरी-चिंचवडमधून ७ जणांना अटक केली आहे.
फलटण तालुक्यातील सासवड येथे पेट्रोलच्या पाईपलाईनला छिद्र पाडून चोरी करण्यात येत होती. या वेळी अनुमाने २ सहस्र लिटर पेट्रोल जवळच्या ज्वारीच्या शेतात पसरले. तसेच शेतात मुरलेले पेट्रोल आजूबाजूच्या विहिरींमध्ये उतरले. त्यामुळे ही घटना उघडकीस आली. बाजारमूल्यानुसार १ लाख ९० सहस्र रुपयांचे पेट्रोल गेल्याचे हिंदुस्थान पेट्रोलिअम कार्पोरेशन लिमिटेड आस्थापनाचे साहाय्यक प्रबंधक विकी सत्यवान पिसे यांनी सांगितले.