घराणेशाहीची कीड
‘आजकाल राजकारणात ‘घराणेशाही’ वाढतच चालली आहे. गल्ली ते देहली घराणेशाहीला ऊत आला आहे. यामध्ये सर्वच पक्ष एकाच माळेचे मणी आहेत. कुणीही एकमेकांकडे बोट दाखवण्याची आवश्यकता नाही. घराणेशाहीमुळे लोकशाहीची गळचेपी होत आहे, तसेच निष्ठावंतांची हेळसांड होत आहे. ३-४ पिढ्या एकाच घराकडे मक्ता रहातो. त्यामुळे प्रामाणिक आणि निष्ठावंत दबला जातो. ज्याच्या त्याच्या गुणवत्तेप्रमाणे ज्याला त्याला योग्य पदे मिळाली पाहिजेत. नेत्याचे ‘गुण आणि काम’ महत्त्वाचे मानले पाहिजे. जात-पात-वंश-घराणे-धर्म न पहाता त्याच्या कामाला महत्त्व दिले पाहिजे. ‘घराणेशाही’ नाही, असे क्षेत्र आज गल्लीपासून देहलीपर्यंत आढळणार नाही. सर्व ठिकाणी ‘घराणेशाहीची कीड’ लागली आहे. जगात मोठी ‘लोकशाही’ मतांंची लाचारी, गुन्हेगारी, गद्दारी वगैरे कारणांनी अपकीर्त होत आहे. कुठेतरी याला आळा बसला पाहिजे.’
– श्री. सखाराम एकशिंगे (केनवडेकर), गोरंबे, कागल, कोल्हापूर.