नक्षलवाद्यांनी बंधक बनवलेल्या सैनिकाची सुटका
विजापूर (छत्तीसगड) – येथे काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांसमवेत झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे २२ सैनिक हुतात्मा झाले होते, तर राकेश्वरसिंह मनहास या सैनिकाला नक्षलवाद्यांनी बंधक बनवले होते.
Abducted CRPF soldier Rakeshwar Singh Manhas released by Naxal terrorists in Chhattisgarhhttps://t.co/mxv3HotTx1
— OpIndia.com (@OpIndia_com) April 8, 2021
या प्रकरणी सरकारने बनवलेल्या एका समितीने नक्षलवाद्यांशी केलेल्या चर्चेनंतर मनहास यांची नक्षलवाद्यांकडून सुटका करण्यात आली. राकेश्वरसिंह मनहास हे जम्मू येथील रहाणारे आहेत.