लस वाया जाण्याची राष्ट्रीय सरासरी महाराष्ट्राच्या नावावर खपवत आहात ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री
मुंबई – लसीकरणावरून महाराष्ट्र शासन राजकारण करत नाही. महाराष्ट्रात लस वाया जाण्याचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीच्या निम्म्यापेक्षाही अल्प आहे. लस वाया जाण्याची राष्ट्रीय सरासरी महाराष्ट्राच्या नावावर खपवत आहात, असे प्रत्युत्तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना दिले आहे. जावडेकर यांनी ‘ठाकरे सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे कोरोनावरील लसीचे ५ लाख डोस वाया गेले’, असा आरोप केला होता.
We have a vaccine wastage rate of 3% in Maharashtra which is half of the national average vaccine wastage rate of 6%: Maharashtra Health Minister Rajesh Tope on COVID19
— ANI (@ANI) April 7, 2021