नागपूर विद्यापिठाचा दीक्षांत समारोह रहित !
नागपूर – कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राष्ट्र्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठाचे दोन्ही दीक्षांत समारोह अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहेत. ११ एप्रिल या दिवशी ‘विशेष दीक्षांत समारोह’ आणि २३ एप्रिल या दिवशी १०८ वा दीक्षांत समारोह आयोजित करण्यात आला होता. विशेष दीक्षांत समारोहात देशाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांना ‘एल्.एल्.डी.’ या मानद पदवीने सन्मानित करण्यात येणार होते; मात्र नागपूरसह संपूर्ण विदर्भातच कोरोनाचा हाहाकार चालू असल्याने दोन्ही कार्यक्रम रहित करावे लागले आहेत. येत्या काळात ‘ऑनलाईन’ पद्धतीने हे समारोह आयोजित केले जाऊ शकतात. त्या दृष्टीने विचार चालू आहे.