१२ वर्षांनंतरच्या महाकुंभचे भव्यदिव्य आयोजन करायला हवे ! – उत्तराखंडचे मुख्यमंत्री रावत
वाराणसी (उत्तरप्रदेश) – महाकुंभ १२ वर्षांतून एकदा येतो, प्रतिवर्षी येत नाही. जत्रा प्रतिवर्षी होतात आणि कुठेही होऊ शकतात; मात्र कुंभ हा हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन, नाशिक आणि वाराणसी येथे होतो. त्यामुळेच कोरोनाच्या काळातही महाकुंभचे भव्यदिव्य आयोजन करायला हवे, असे मत उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांनी येथे व्यक्त केले.