विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवून दोषी अधिकार्यांवर कठोर कारवाई करा !
|
हातकणंगले (जिल्हा कोल्हापूर), ९ एप्रिल (वार्ता.) – विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवून दोषी अधिकार्यांवर कठोर कारवाई करा, या मागणीचे निवेदन विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीच्या वतीने हातकणंगले येथील तहसीलदार प्रदीप उबाळे यांना ६ एप्रिल या दिवशी देण्यात आले.
या वेळी विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीचे समन्वयक श्री. किरण दुसे, हुपरी येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. प्रवीण पाटील आणि श्री. पोपट हांडे, लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेचे हुपरी शहराध्यक्ष श्री. नितीन काकडे, श्री दुर्गवेध प्रतिष्ठानचे श्री. सचिन पाटील आणि श्री. महादेव आढावकर उपस्थित होते.