महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संगणकीय प्रणालीवर रशियातून आक्रमण झाल्याचे उघड !
मुंबई – महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एम्आयडीसी) संगणकीय प्रणालीवर २१ मार्चच्या मध्यरात्री सायबर आक्रमण झाले होते. ते रशियातून झाल्याची माहिती पोलीस अन्वेषणात उघड झाली आहे. या आक्रमणात आरोपींनी ‘रॅन्समवेअर’ वापरले होते. या आक्रमणामुळे एम्आयडीसीच्या १६ विभागांतील कामकाज ८ घंट्यांसाठी ठप्प झाले. ‘आरोपींनी ५०० कोटी रुपयांची मागणी केली होती’, असे म्हटले जाते; पण अन्वेषणात तसा उल्लेख नाही. या घटनेची सायबर विभागाकडून नोंद घेण्यात आली आहे.