५ लाख रुपयांची लाच घेतांना ठाणे महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. राजू मुरुडकर यांना अटक !
ठाणे, ९ एप्रिल (वार्ता.) – ठाणे महानगरपालिकेला कृत्रिम श्वाशोच्छ्वास यंत्र (व्हेंटिलेटर) पुरवणार्या एका आस्थापनाकडून ५ लाख रुपयांची लाच घेतांना ठाणे महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. राजू मुरुडकर यांना ८ एप्रिलच्या सायंकाळी ऐरोली येथे सापळा रचून ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्या विरोधात राबाडे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करणात आला आहे. हे आस्थापन महानगरपालिकेला दीड कोटी रुपयांचे कृत्रिम श्वाशोच्छ्वास यंत्र पुरवणार होते. या रकमेच्या १० टक्के रक्कम मुरुडकर यांनी मागितली होती. १५ लाख रुपयांच्या लाचेच्या रकमेतील ५ लाख रुपयांचा हप्ता घेतांना ही कारवाई करण्यात आली. मुरुडकर यांना ११ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. (कोरोनाने रुद्र रूप धारण केलेले असतांना अशा प्रकारे लाचखोरी करणार्या आरोग्य अधिकार्याला कठोर शिक्षा करून त्यांची सर्व संपत्ती जप्त करायला हवी. – संपादक)