हिंदु समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर अस्वले यांच्या वतीने आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान यांच्या विरोधात राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार
उत्तरप्रदेश येथील डासना मंदिराचे महंत यति नरसिंहानंद यांचा शिरच्छेद करण्याची धमकी दिल्याचे प्रकरण
कोल्हापूर, ९ एप्रिल (वार्ता.) – नवी देहली येथे आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान यांनी ‘पैगंबर यांचा अवमान करणार्यांचा शिरच्छेद केला पाहिजे. त्यांची जीभ कापली पाहिजे; मात्र भारतातील कायदे याची आम्हाला अनुमती देत नाहीत’, असे चिथावणीखोर वक्तव्य ट्वीट केले आहे. महंतपदावरील हिंदूंच्या एका धर्मगुरूंचा शिरच्छेद करण्याची मागणी समाजमाध्यमातून करणे हे अत्यंत धक्कादायक आहे. तरी या प्रकरणी आमदार अमानतुल्ला खान यांच्यावर ५०४, ५०६, २९५ (अ), १५३, यांसह विविध योग्य त्या कायदेशीर कलमांचा वापर करून गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी तक्रार हिंदु समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर अस्वले यांनी ९ एप्रिल या दिवशी राजवाडा पोलीस ठाण्यात प्रविष्ट केली आहे. ही तक्रार पोलीस अधिकारी प्रमोद जाधव यांनी स्वीकारली.
(म्हणे)‘पैगंबर यांचा अवमान करणाऱ्यांचा शिरच्छेद केला पाहिजे!’
– #AAP चे आमदार अमानतुल्ला खान👉डासना मंदिराचे महंत यति नरसिंहानंद यांच्या विधानाचे प्रकरण
👉 पोलिसांनी महंत यति #नरसिंहानंद यांना संरक्षण पुरवले पाहिजे!https://t.co/9sejj0O9XK#ArrestAmanatullahKhan#sundayvibes pic.twitter.com/P1KpIz2KNM
— Sanatan Prabhat (@sanatanprabhat) April 4, 2021
पोलीस अधिकारी प्रमोद जाधव यांनी तक्रार स्वीकारून योग्य त्या कार्यवाहीसाठी ती संबंधित ठिकाणी पाठवली जाईल, असे आश्वासन श्री. अस्वले यांना दिले. या वेळी श्री महालक्ष्मी भक्त समितीचे श्री. प्रमोद सावंत, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री शिवानंद स्वामी, बाबासाहेब भोपळे, किरण दुसे उपस्थित होते.
पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,
१. महंत यति नरसिंहानंद म्हणजे पूर्वाश्रमीचे दीपक त्यागी हे विदेशातून उच्च विद्याविभूषित होऊन भारतात आलेले व्यक्तिमत्त्व आहे. तरुण वयात अभियांत्रिकीमध्ये उच्च शिक्षण घेऊन भारतात नोकरीसाठी आल्यावर एका घटनेमुळे त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आणि ते महंत यति नरसिंहानंद झाले.
२. अमानतुल्ला खान यांच्यावर वर्ष २०१९ मध्ये त्यांच्यावर देहली येथील एका दंगलीच्या संदर्भात गुन्हा नोंद आहे. नागरिकता सुधारणा विधेयकाविषयी अपप्रचार करून त्यांनी दंगल होईल, असे वातावरण निर्माण केले होते. त्याचप्रमाणे गुप्तचर खात्यातील पोलीस अंकित शर्मा यांच्या हत्येच्या गुन्ह्यात सहभागी आणि दंगलीत मोठा हात असणारा आपचा नगरसेवक ताहीर हुसेन याची त्यांनी पाठराखण केली होती.