परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या डोळ्यांत संपूर्ण विश्व सामावले आहे, असे वाटणे
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यशाळेतील जिज्ञासूंसाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग आयोजित करण्यात आला होता. त्या सत्संगात मीही उपस्थित होते; परंतु मला आध्यात्मिक त्रास होत असल्याने मला परात्पर गुरु डॉक्टरांशी बोलता येत नव्हते. असे असले, तरी जेव्हा जेव्हा मी त्यांच्याकडे पहात असे, तेव्हा मला ‘त्यांच्या डोळ्यांत संपूर्ण विश्व सामावले आहे’, असे जाणवत होते. मला त्यांच्या डोळ्यांत ग्रह, तारे आणि आकाशगंगा दिसत होती. असे वाटते की, ‘त्यांच्या आतच सारे विश्व असून ते त्या विश्वाचे नियंत्रक आहेत. जगात, तसेच साधकांच्या समवेत जे काही घडत आहे, ते सर्व त्यांना ठाऊक आहे आणि त्या सर्वांकडे त्यांचे लक्ष आहे.’ त्या वेळी माता यशोदाला श्रीकृष्णाच्या मुखात संपूर्ण ब्रह्मांडाचे दर्शन झालेल्या कथेची मला आठवण झाली. दुसर्या दिवशी मी हे चित्र काढले. त्या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘पू. भार्गवराम यांच्या छायाचित्राकडे पाहून काय जाणवते ?’, याविषयी प्रयोग आला होता. त्या छायाचित्रात पू. भार्गवराम यांचे मुख उघडे होते. ‘हे छायाचित्र पाहून यशोदामाता आणि श्रीकृष्ण यांच्या प्रसंगाची आठवण होते’, असे लिहिले होते. मला परात्पर गुरु डॉक्टरांच्या डोळ्यांकडे पाहून अशीच अनुभूती आली, जी मी चित्रात उतरवली.’
कु. अॅलिस एस्.